मोदी नावाचं मोठं वादळ येणार अन् सारे साफ होणार, भाजपच्या बड्या नेत्यांचं भाष्य काय?
'अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे ही एकत्र बसून कोणावरही अन्याय होणार नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. महायुती प्रचंड ताकतीने एकत्र आहे. अकरा पक्ष महायुतीत एकत्र आहेत'
नांदेड, २२ डिसेंबर २०२३ : नापासचा शिक्का बसलेल्या पुण्यातील आमदारांनी धास्ती घेतलीय. अजित पवार यांच्या एंट्रीने घरची वाट दाखवायची हे रिपोर्ट कार्ड ठरवणार यावर भाजपाचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे ही एकत्र बसून कोणावरही अन्याय होणार नाही. आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. महायुती प्रचंड ताकतीने एकत्र आहे. अकरा पक्ष महायुतीत एकत्र आहेत . 45 प्लस लोकसभेच्या आम्ही जागा जिंकणार आहोत. राज्याच्या विधानसभेत सव्वादोनशेच्यावर आमदार दिसतील इतकी अभेद्य युती आमची आहे. त्यामुळे कोणी चिंता करायची गरज नाही असे बावनकुळे म्हणाले. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही एकमेकांना ताकतीने मदत करणार आहोत. येणाऱ्या निवडणुकीत मोदी नावाचे मोठ वादळ येणार आहे आणि या वादळात सारे साफ होणार आहेत अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.