उद्धव ठाकरे यांचे हात मुंबईकरांच्या रक्तानं माखलेले, आशिष शेलार यांचा आरोप, काय आहे प्रकरण?
आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, कोणत्या प्रकरणावरून शेलारांनी केला हल्लाबोल?
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे यांचे हात रक्ताने माखलेले आहे, असा गंभीर आरोप करत २०२० मध्ये उद्धव ठाकरे सत्तेत असताना कमला मिल आग प्रकरणातील अधिकाऱ्याला मुक्त केलं असल्याची टीकाही शेलार यांनी केली आहे. ‘उद्धव ठाकरे यांना नम्र विनंती करेल, आदित्य ठाकरे यांच्या नादी लागून या प्रकरणात पडू नका, तुम्ही आम्हाला आव्हानाने प्रश्न विचारत असाल तर तुमचे हात तरी स्वच्छ असायला हवेत, तुमचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, असे मी म्हटले तर खोटं ठरणार नाही.’, अशी घणाघाती टीकाही शेलार यांनी केली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उत्तर द्या नोव्हेंबर २०२० मध्ये तुमचं सरकार होतं, त्यावेळी तुम्ही कमला मिल आणि रेस्टॉरंटच्या मालका तुम्ही का मुक्त केलं, असा सवाल ही आशिष शेलार यांनी यावेळी उपस्थित engकेला आहे.