सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे वगळल्यानंतर आशिष शेलार यांचा कर्नाटक सरकारवर निशाणा

सावरकर अन् हेडगेवार यांचे धडे वगळल्यानंतर आशिष शेलार यांचा कर्नाटक सरकारवर निशाणा

| Updated on: Jun 16, 2023 | 4:52 PM

VIDEO | भाजप नेते आशिष शेलार यांचा टि्वट करून कर्नाटक सरकारवर निशाणा, काय केलं म्हणाले...

मुंबई : कर्नाटकच्या मंत्रिमंडळाने या शैक्षणिक वर्षासाठी कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वी ते १० वीच्या कन्नड आणि सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांच्यावरील प्रकरणे काढण्यास मंजुरी दिली. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना भाजपच्या आशिष शेलार यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. आशिष शेलार म्हणाले, ‘स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार यांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याच्या कार्नाटक सरकारच्या तुघलकी निर्णयाचा आम्ही निषेध करतो! अरे, बेक्कल काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही देशाच्या अशा महान सुपुत्रांचे धडे पाठ्यपुस्तकातून वगळालही पण जनतेच्या मनातून आणि इतिहासाच्या पानातून त्यांचे महान कार्य कधीच वगळू शकणार नाही! महाराष्ट्रातील तथाकथित हिंदुत्ववादी “उबाठा” आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेसच्या असल्या 60 वर्षांच्या कारभाराला कंटाळून जनतेने त्यांना देशातूनच वगळून टाकायचे ठरवलेय! तर काँग्रेसला साथ देणाऱ्या “उबाठा”ला आमदारांनी शिवसेनेतून वगळलेच आता महाराष्ट्रातील जनताही लवकरच उबाठा आणि त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवक्त्यांना धडा शिकवेल, असेही म्हणाले.

Published on: Jun 16, 2023 04:52 PM