Chitra Wagh : ‘स्वयंघोषित विश्व गुरू, उबाठाचा पोपट अन् रडत राऊत…’, चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
भाजप नेत्या आणि प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर भाष्य करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. बघा चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?
भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांचा उल्लेख उबाठाचा पाळलेला पोपट आणि रडत राऊत असा करत त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘संजय राऊत यांनी भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. स्वयंघोषित विश्व गुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावं, भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची कुवत नाही’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघात केलंय. पुढे चित्रा वाघ असंही म्हणाल्या, ‘भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वारसदारावर बोलण्यापेक्षा जरा स्वत:च्या गटाला पडलेलं खिंडार सांभाळा’, असा खोचक सल्लाही चित्रा वाघ यांनी राऊतांना दिलाय. यावेळी त्यांनी गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. ‘गट प्रमुख असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना तर आपण विधान परिषद आमदार आहोत, याचा विसर पडलाय. त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्या…नाहीतर काही दिवसात तुमच्या गटाचं अस्तित्व देखील उरणार नाही.’, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..

सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'

कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
