मगरमच्छ के आंसू.... म्हणत गिरीश महाजन यांनी कुणाला लगावला टोला

मगरमच्छ के आंसू…. म्हणत गिरीश महाजन यांनी कुणाला लगावला टोला

| Updated on: Feb 11, 2023 | 1:34 PM

पत्रकार शशिकांत वारिसे प्रकरणातील आरोपी वाचू शकत नाही, गिरीश महाजन यांनी थेट सांगितले...

नाशिक : राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. कोकणातील नाणार रिफायनरीविरुद्ध लोकांमध्ये जागृती करणाऱ्या पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या होते. हे धक्कादायक असल्याचे संजय राऊत यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांना याबाबत इशारा देणारे पत्र लिहिले आहे. यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी भाष्य केले आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केले आहे. यासह हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याच्या आदेशासह आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. हे कायद्याचं राज्य असून कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणाही साधला आहे.

Published on: Feb 11, 2023 01:34 PM