‘शरद पवारांनी आता हरिनामाचा जप करावा, म्हणजे…’, भाजप नेत्याची खोचक टीका
सत्ता असताना शरद पवार यांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, असं वक्तव्य करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. तर शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, असा खोचक टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
सत्ता असताना शरद पवार यांनी महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, असं वक्तव्य करत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचा चेहरा सुधारण्याची आणि बदलण्याची आवश्यकता होती, ती देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. शरद पवार यांच्यामुळे फक्त पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला आहे. जवळपास ५० ते ६० वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं आहे.’, असे वक्तव्य करत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पडळकर पुढे असेही म्हणाले, शरद पवार आता तुम्ही निवांत रहा आणि हरिनामाचा जप करा, म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची इच्छा निर्माण होईल, अशी टीका करत खोचक सल्लाही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

