आईला कुणी त्रास देत नसतं, सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून सुप्रिया सुळे यांना कुणाचा खोचक टोला?
'सुप्रिया सुळे यांनी स्वतः विचार करावा, कशाप्रकारे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना त्रास दिला गेला. त्या स्वतः खासदार असताना त्या दिल्लीत फिरत होत्या. सुनेत्रा वहिनी लोकसभा पाहत होत्या. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे', भाजप आमदार नेत्याचा सुप्रिय सुळेंवर हल्लाबोल
सुप्रिया सुळेंच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. तर बारामतीची खरी जनता सुनेत्रा पवारांनी सांभाळली आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी म्हटलंय. भिती वाटायला लागली म्हणून सुनेत्रा पवार आई… आईला कुणी त्रास देत नसतं…, असं म्हणत प्रसाद लाड यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. ‘सुप्रिया सुळे यांनी स्वतः विचार करावा, कशाप्रकारे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना त्रास दिला गेला. त्या स्वतः खासदार असताना त्या दिल्लीत फिरत होत्या. सुनेत्रा वहिनी लोकसभा पाहत होत्या. आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण बारामतीची खरी जनता सुनेत्रा पवारांनी सांभाळलीय. सुप्रिया सुळे यांना एवढंच सांगणार की सुनेत्रा पवार जर आईसमान असतील तर त्यांनी माघार घ्यावी, आईच्या विरोधात निवडणूक लढवू नये…’, असेही प्रसाद लाड यांनी म्हटले.