मविआ सरकार राणेंचा आवाज दाबू शकत नाही – Nilesh Rane
मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही वीट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्यांना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तूट कशी झाली, यावर अजित पवार बोलतील का, त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
रत्नागिरीः भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) पुन्हा एकदा आक्रमक झालेत. देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) हे किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घालून फिरतात. शिवसेना नेते संजय राऊतच एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून खासदार होतील, अशा टीकेच्या फैरी त्यांनी रविवारी झाडल्या. निलेश म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्यामुळे त्यांना अशा केसेस टाकून घाबरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, फडणवीस पुरून उरतील. ते किती तरी ठाकरे आणि पवार खिशात घेऊन फिरतात. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी योग्य नाहीत. त्यांना अर्थ खाते किती कळते ते माहीत नाही, पण अलोकेशन ऑफ फंड म्हणजे बजेट नव्हे. मी स्वतः फायनान्सचा विद्यार्थी आहे. मला बजेट माहित आहे. अलोकेशन ऑफ फंड म्हणजे इम्प्लिमेट ऑफ फंड नाही. मराठी भवनसाठी प्रत्येक वेळी निधी जाहीर होतो, पण आजवर एकही वीट रचलेली नाही. कोकणातील गडकिल्ल्यांना फक्त निधी जाहीर करतात. प्रत्यक्षात किल्ले ढेपाळत आहेत. वित्तीय तूट कशी झाली, यावर अजित पवार बोलतील का, त्यांना फक्त कारखाने कसे लुटायचे ते माहीत आहे, असा आरोपही त्यांनी केला.