‘ठाकरे गट ‘या’ चिन्हावर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार’, भाजप नेत्याचा मोठा दावा
VIDEO | विधानसभेच्या जागांबाबत तिन्ही पक्षांनी चाचपणी सुरू असताना कुणी केला ठाकरे गटाबाबत मोठा दावा
मुंबई : देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच महाराष्ट्रातील पक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर मविआमध्ये याबाबत जागावाटपावर चर्चा सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहे. तर विधानसभेच्या जागांबाबत तिनही पक्षांनी राज्यातील ४८ मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाबद्दल मोठा दावा केला आहे. ‘वर्षभर उद्धव ठाकरे यांना नव्याने पक्ष बांधणं शक्य नाही. मुळात त्यांचा तो पिंड नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षचिन्हही मिळणार नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार, आमदार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत’, पुढे ते असेही म्हणाले की, तसा प्रस्ताव खासदार संजय राऊत स्वतः दोन वेळा घेऊन गेलेत. हे खरं की खोटं राऊतांनी सांगावं. येणाऱ्या निवडणूका घड्याळ या चिन्हावर लढणार असून तयारी त्यांनी आता करावी. हे मशाल चिन्ह राहणार नाही. संपूर्ण पक्ष राष्ट्रवादीत विलीन होत आहे. तशी तयारी संजय राऊतांनी केली असल्याचे राणे म्हणाले.