Pankaja Munde on OBC Reservation | इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारचं : पंकजा मुंडे

| Updated on: Dec 15, 2021 | 7:23 PM

विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं इम्पिरीकल डेटा 3 महिन्यात तयार करु शकतो असं म्हटलंय. त्यावरुनही पंकजा यांनी निशाणा साधलाय.

मुंबई : इम्पेरीकल डेटा देण्याचं काम पूर्णपणे राज्य सरकारनं होतं. पण राज्य सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल ऐकण्याची दुर्दैवी वेळ आज संपूर्ण ओबीसी समाजावर आल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. आरक्षणाशिवाय होणारी निवडणूक हा ओबीसींवर घोर अन्याय आहे, असंही त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता राज्य सरकारनं इम्पिरीकल डेटा 3 महिन्यात तयार करु शकतो असं म्हटलंय. त्यावरुनही पंकजा यांनी निशाणा साधलाय. राज्य सरकार जर 3 महिन्यात हे काम करु शकत होतं, तर आधी का या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. इतकंच काय तर राज्य सरकार निवडणूक आयोगाची समजूत घालण्यातही अपयशी ठरल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.