Pankaja Munde स्पष्टच म्हणाल्या... शिवशक्ती दौऱ्याला निवडणुकीचा अजेंडा? शिवशक्ती परिक्रमेचे कारण काय?

Pankaja Munde स्पष्टच म्हणाल्या… शिवशक्ती दौऱ्याला निवडणुकीचा अजेंडा? शिवशक्ती परिक्रमेचे कारण काय?

| Updated on: Sep 04, 2023 | 12:04 PM

VIDEO | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू, पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती दौऱ्याला आगामी निवडणुकीचा अजेंडा? यात्रेच्या माध्यमातून आठ दिवस राज्यातील जिल्हे फिरणार

छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू झाली असून या यात्रेच्या माध्यमातून पंकजा मुंडे आठ दिवस राज्यातील जिल्ह्यात फिरणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी 1994 संघर्ष यात्रा काढली होती. त्यानंतर राज्यातील काँग्रेसचं सरकार गेलं होतं. मात्र, पंकजा मुंडे यांच्या या शिवशक्ती परिक्रमेमागे आगामी निवडणुकीचा अजेंडा असल्याची चर्चाही होत आहे. यासर्व चर्चांवर पंकजा मुंडे यांनी थेट भाष्य केले आहे. शिवशक्ती परिक्रमा दौऱ्याचा आज पहिला दिवस असून औरंगाबाद येथील संत भगवानबाब मंदिरात दर्शन घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंदिरात आरतीही केली. त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शनही घेतलं. आज त्या औरंगाबाद ते नाशिक असा प्रवास करणार आहेत. शिवाची शक्ती आणि माझी शक्ती दोघांचेही दर्शन व्हावे म्हणून ही परिक्रमा करण्यात येत आहे. आज भगवान बाबांची जयंती आहे. भगवान बाबा यांच्या समोर नतमस्तक होऊन मी ही परिक्रमा करत आहे. आज माझे वडील सोबत नाहीत, भगवान बाबाही नाहीत. माझे वडील जिथे असतील तिथून मला आशीर्वाद देतील, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 04, 2023 12:04 PM