...त्यांचा शेवट जवळ आलाय, भाजप नेत्यानं संजय राऊत यांच्याबद्दल काय केलं भाष्य?

…त्यांचा शेवट जवळ आलाय, भाजप नेत्यानं संजय राऊत यांच्याबद्दल काय केलं भाष्य?

| Updated on: Nov 21, 2023 | 2:53 PM

संजय राऊत तुरुंगातून जाऊन आल्यावर सुद्धा शेवटची भाषा करतात त्यांच्यासारख्या आरोपीला हे शोभा देणारं नाही, यामध्ये आपला शेवट होतो याची त्यांनी काळजी घ्यावी, अशी खोचक टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली. सापाला मारलं तरी शेपटीत जीव असल्याने ती वळवळते, दिवा जळताना फडफडतो. त्याप्रमाणे राऊत प्रखर टीका करताय त्यामुळे त्यांचा शेवट जवळ आल्याची चिन्ह दिसतंय..

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३ : संजय राऊत यांनी ट्वीट करून एका नेत्याचा फोटो शेअर केला. त्यानंतर ते म्हणाले मी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. पण भाजपनेच त्यांच्या नेत्याचं नाव घेतलं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, संजय राऊतांचं बोलणं पोरकटपणाचं आहे. फोटो टाकायचा स्पष्टपणे टीका करायची. नाव घ्यायचं नाही हे बालिशपणाचं बोलणं आणि वागणं आहे. ते भ्रमिष्ट झालेत वैफल्यग्रस्त झालेत, त्यांनी आचार-विचार पायदळी तुडवत व्यक्तिकेंद्रीत त्यांच्या टीका आहेत. महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या राजकारणाचा किळस आला आहे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले. तर संजय राऊत तुरुंगातून जाऊन आल्यावर सुद्धा शेवटची भाषा करतात त्यांच्यासारख्या आरोपीला हे शोभा देणारं नाही, यामध्ये आपला शेवट होतो याची त्यांनी काळजी घ्यावी, अशी खोचक टीका दरेकरांनी केली. सापाला मारलं तरी शेपटीत जीव असल्याने ती वळवळते, दिवा जळताना फडफडतो. त्याप्रमाणे संजय राऊत प्रखर टीका करताय त्यामुळे त्यांचा शेवट जवळ आल्याची चिन्ह दिसतंय, असेही प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

Published on: Nov 21, 2023 02:46 PM