चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रवीण दरेकर म्हणाले, ‘ ते ऑफ द रेकॉर्ड बोलत असतात पण…’
VIDEO | ‘2024 पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये म्हणून पत्रकारांना ढाब्यावर अन् चहाला न्या’, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल क्लिपवर स्पष्टीकरण देताना प्रवीण दरेकर म्हणाले, 'ऑफ द रेकॉर्ड बोलत असतात पण...'
मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ | आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या क्लीपवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्याचा शब्दाशः अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे शब्द छळ करण्यात किंवा राजकीयदृष्ट्या त्याकडे पाहणं योग्य ठरणार नाही. तर पत्रकारांनी त्यांचा उद्देश तसा घेऊ नये, त्याचा वाद न करता त्यांची भूमिका लक्षात घ्यावी, मैत्रीचं वातावरण तयार व्हावं असं ते ऑफ द रेकॉर्ड बोलत असतात पण आता त्याचा वेगळा अर्थ क काढून गवगवा केला जातोय’, असेही ते म्हणाले. प्रवीण दरेकर आज टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला आले असताना त्यांनी हे म्हटले तर महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यास शक्ती दे, राज्यात ज्या काही नैसर्गिक अपत्ती आल्यात त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. तो स्थिर होण्यासाठी शक्ती आणि ताकद दे, असे मागणं ही मागितले.