चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान रावसाहेब दानवे यांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, बघा खुमासदार किस्से
VIDEO | चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने रावसाहेब दानवे पुण्यात, बघा काय केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेते केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे. भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या शैलीत खुमासदार किस्से सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे चोरांच्या हाती दिले आहे. निवडणूक आयोग विकले गेले आहे. शिवसेना पक्षाविषयी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय चुकीचा, पक्षपाती असल्याने हा आयोग बरखास्त केला पाहिजे आणि प्रत्यक्ष निवडणूका घेऊनच आयुक्त आणि आयोग नेमला पाहिजे, अशी मोठी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीअशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. यावर भाजप नेते आणि मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोग बरखास्त करायचं म्हणताय तर त्या जागेवर संजय राऊत यांना नेमायच का..? असा खोचक सवालही रावसाहेब दानवे यांनी केला आहे.