नवाब मलिक यांनी नैतिकदृष्ट्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : सुभाष देशमुख

नवाब मलिक यांनी नैतिकदृष्ट्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा : सुभाष देशमुख

| Updated on: Feb 27, 2022 | 7:58 PM

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे इडिच्या चौकशीला सामोरे जात आहेत.त्यामुळे त्यांनी नैतिक दृष्ट्या  अगोदर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी सहकार मंत्री भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी माढ्यात केलंय.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे इडिच्या चौकशीला सामोरे जात आहेत.त्यामुळे त्यांनी नैतिक दृष्ट्या  अगोदर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य माजी सहकार मंत्री भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांनी माढ्यात केलंय.माढ्यात नगरसेवक शहाजी साठे व नगरसेविका संगिता साठे यांचा  सन्मान करण्यासाठी ते  आले असता  त्यांनी साठे यांच्या शेतात  हुरडा पार्टीचा  अस्वाद घेतल्यानंतर त्यांच्याशी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,एखाद्या विभागाच्या  चौकशीला सामोरे जाण्यासाठी नैतिक दृष्ट्या राजीनामा देणे क्रमप्राप्त आहे.पदावर असताना चौकशी करताना मर्यादा असतात.मंत्री मलिक यांनी राजीनामा देणे गरजेचे असून चौकशी केल्यावर दोषी नसतील तर मलिकानी घाबरायची गरज नाही, असं सुभाष देशमुख म्हणाले.