BhauBeej 2023 : चित्रा वाघ यांचा राजकारणातील भाऊ कोण?; नाव ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

BhauBeej 2023 : चित्रा वाघ यांचा राजकारणातील भाऊ कोण?; नाव ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

| Updated on: Nov 15, 2023 | 5:29 PM

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहिण भावाचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आणखी काही भाऊ-बहिण आहेत. त्यामध्ये भाजप नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांचा उल्लेख केला जातो. यांनीही आपली भाऊबीज साजरी केली. दोघांनी एकमेकांना शुभ अशीर्वाद दिलेत

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | राजकीय वर्तुळातील भाऊबीज आणि रक्षाबंधनाची नेहमीच चर्चा होत असते. यंदाही राजकीय भाऊबीज साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील बहिण भावाचं नातं सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आणखी काही भाऊ-बहिण आहेत. ज्यांच्या पवित्र नात्यांचा उल्लेख होते. त्यामध्ये भाजप नेते प्रसाद लाड आणि चित्रा वाघ. यांनीही आपली भाऊबीज साजरी केली. यावेळी प्रसाद लाड म्हणाले, ताईच्या सर्व राजकीय इच्छा पूर्ण व्हाव्यात, असे म्हणत प्रसाद लाड यांनी चित्रा वाघ यांना भाऊबीज निमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी चित्रा वाघ यांच्याबद्दल विश्वास व्यक्त करत प्रसाद लाड म्हणाले, भविष्यात चित्रा वाघ या राज्य देशाच्या राजकारणात उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणून पाहायला मिळेल.

तर यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, ‘गेली कित्येक वर्ष आम्ही राज्याच्या राजकारणात एकत्र काम करतो. पण राजकारणाच्या पलीकडचं पवित्र आमचं नातं आहे. प्रसाद दादा म्हणजे हिरा आहे. त्याची पारख जोहरी करू शकतो. तशी आमच्या देवेंद्रजींनी केली आहे. त्यामुळे ते कोंदणात नक्की बसतील. याची मला खात्री आहे.’ तर राजकारणातील भाऊ म्हणून संजय राऊत यांना खोचक सल्ला देताना चित्रा वाघ म्हणाल्या भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांचा इतका द्वेष करू नका अन् आज वाढदिवस असल्याने त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छाही चित्रा वाघ यांनी दिल्यात.

Published on: Nov 15, 2023 05:29 PM