'उद्धव ठाकरे यांच्या मानगुटीवर बसलेला संजय राऊत हा वेताळ'

‘उद्धव ठाकरे यांच्या मानगुटीवर बसलेला संजय राऊत हा वेताळ’

| Updated on: Mar 19, 2023 | 6:16 PM

VIDEO | 'मातोश्रीचं वाटोळं करणारा वेताळ म्हणजे संजय राऊत... उद्धव ठाकरे गटाची 100 शकले झाल्याशिवाय हा वेताळ शांत होणार नाही', कुणी केली संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका

रत्नागिरी : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने त्यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांनी केलेल्या टीकेमुळे चर्चेत असतात. संजय राऊत हे नेहमीच शिंदे सरकार, भाजप, देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असतात. अशातच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘संजय राऊत हे विक्रमाच्या म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्या मानगुटीवर बसलेला वेताळ आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे विक्रम आणि वेताळची जोडी आहे. उद्धव ठाकरे हे विक्रमादित्य होते. मात्र त्यांच्या मानगुटीवर संजय राऊत नावाचा वेताळ बसलाय, त्याने गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे, शिवसेना आणि ठाकरे गटाला लयास नेले आहे.’, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तर जे वाटोळं करायचं शिवसेनेचं जो पक्ष गेला, धनुष्यबाण गेलं, सरकार गेलं, उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री पद गेलं आणि आता हळूहळू शिवसैनिक देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात निघून जातील. या सर्वाला कारणीभूत कोण असेल तर तो शिवसेना आणि ठाकरे यांच्या मानगुटीवर बसलेला हा संजय राऊत नावाचा वेताळ आहे, असे म्हणत प्रमोद जठार यांनी खोचक टीकाही केली आहे.

Published on: Mar 19, 2023 06:16 PM