Ameet Satam | मुंबई पालिकेत 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

Ameet Satam | मुंबई पालिकेत 5 हजार कोटींचा घोटाळा, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

| Updated on: Jul 09, 2021 | 12:22 PM

मुंबई महापालिकेच्या अग्निसुरक्षा शुल्क आकारणीच्या मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने आले आहेत. बीएमसीमध्ये अग्निशमन विभागात पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा ‘वाझे’ कोण? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. 

कसे आकारणार अग्निसुरक्षा शुल्क

भाजपकडून सत्ताधारी शिवसेना निशाण्यावर आली आहे. मुंबई महापालिका 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याच्या तयारीत आहे. 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे पैसे घेतले जाणार आहेत. तर ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार आहे.

कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर, पाणीपट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला होता. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. एक दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला.