तुमच्या बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर… गोपीचंद पडळकरांचा कुणाला इशारा?
सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी तालुक्यात तुमच्या बापाची जहागिरदारी आली नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर बिनकामाचे घरी जावे लागेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी खानापूर-आटपाडी तालुक्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांना दिला आहे. बघा नेमकं काय म्हणाले पडळकर?
भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या मतदार संघातील शासकीय अधिकारी आणि पोलीसांना चांगलेच फटकारल्याचे पाहायला मिळाले आहे. खानापूर-आटपाडी तालुक्यात तुमच्या बापाची जहागिरदारी आली नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर बिनकामाचे घरी जावे लागेल, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकरांनी खानापूर-आटपाडी तालुक्यातील अधिकाऱ्यांसह पोलिसांना दिला आहे. तसेच कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्यासाठी आमच्या लफडयात पडू नका, नाहीतर अडचणीचे होईल, असा इशारादेखील गोपीचंद पडळकरांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. तर कोणत्या अधिकाऱ्याला जर आपण राजकीय पुढाऱ्याचे नोकर आहोत, असं वाटतय त्यांनी राजीनामा देऊन, त्या नेत्याच्या घरी जाऊन काम करावे, असं देखील स्पष्ट करत सर्वसामान्य जनतेला त्रास होणार असेल तर आपण संघर्षाची भूमिका घेऊ, असं देखील गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे. ते सांगलीच्या विटा येथे आयोजित भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.