हा बैल 25 वर्ष बसलाय, आता बदला… भाजप नेत्याचा रोख राष्ट्रवादीकडे? रामराजे निंबाळकरांकडे?
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. रामराजेंच्या घरातच सर्व पदे असून आता ही स्थिती बदलली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
साताराः एखादा बैल औताला बसला तर आपण काय करतो, बाजारात नेतो नं? असा बैल अपशकुनी आहे, असं आपण म्हणतोय. पण हा बैल 25 वर्ष झाले बसलाय, याला बदला…अशी घणाघाती टीका साताऱ्यातले भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यावर त्यांनी नाव न घेता ही टीका केली. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण येथे संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील घराणेशाहीवर जोरदार टीका केली. रामराजेंच्या घरातच सर्व पदे असून आता ही स्थिती बदलली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
Published on: Sep 19, 2022 01:25 PM
Latest Videos