कणकवलीत नसबंदी कुत्र्यांची सभा, भटक्या कुत्र्यांवर…; उद्धव ठाकरेंवर कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
उद्धव ठाकरे यांच्या या कोकण दौऱ्यातील सभेवरून भाजप आमदार नितेश राणे यांची जोरदार टीका केली. कणकवलीत नसबंदी झालेल्या कुत्र्यांची सभा झाली. भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाने लक्ष घालाव, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे.
मुंबई, ५ फेब्रुवारी, २०२४ : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण सिंधुदुर्ग-रत्नागिरी दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. कणकवली, राजापुरात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या या कोकण दौऱ्यातील सभेवरून भाजप आमदार नितेश राणे यांची जोरदार टीका केली. कणकवलीत नसबंदी झालेल्या कुत्र्यांची सभा झाली. भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाने लक्ष घालाव, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. ते म्हणाले, काल आमच्या कणकवलीत नसबंदी झालेले भटके कुत्रे आलेले…या कुत्र्यांचा त्रास वाढत चाललेला आहे. त्यांच्यावर बंदी घालावी अशी मागणी मी केलेली आहे. जिल्ह्यातील जनतेला काल नाहक त्रास झाल्याचेही राणे म्हणाले. तर उद्धव ठाकरे यांचा डीएनए तपासायला हवा, अशी मागणीही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासभेवर बोलताना केली.