'त्या' टीकेवरून शिवेंद्रराजे आक्रमक! छत्रपती घराण्याबद्ददल न बोललंच बरं, संजय राऊत यांना दिला थेट इशारा

‘त्या’ टीकेवरून शिवेंद्रराजे आक्रमक! छत्रपती घराण्याबद्ददल न बोललंच बरं, संजय राऊत यांना दिला थेट इशारा

| Updated on: Mar 04, 2023 | 4:53 PM

VIDEO | 'त्यावेळी संभाजी राजे यांना तिकीट का नाकारलं?', शिवेंद्र राजे भोसले यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

सातारा : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे कोल्हापूरनंतर सातारा दौऱ्यावर आहेत. सातारा दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी छत्रपती घरण्यावर आणि भाजपवरही टीका केली. राऊत यांनी केलेल्या या टीकेनंतर भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट प्रत्युत्तर देत संजय राऊत यांना छत्रपती घराण्यार बोलायचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना फटकारले आहे. राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि ठाकरे गटाला छत्रपती घराण्याबद्दल एवढा आदर होता.तर त्यांनी तो आदर राज्यसभेच्यावेळी का ठेवला नाही. कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना राज्यसभेचं तिकीट न देता ते त्यांना का डावलण्यात आले. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबद्ददल न बोललेच बरं असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

Published on: Mar 04, 2023 04:53 PM