Santosh Deshmukh Case : 2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

Santosh Deshmukh Case : 2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? सुरेश धसांचा खळबळजनक आरोप

| Updated on: Jan 06, 2025 | 8:53 AM

2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? झाल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी केला आहे. इतकंच नाहीतर दावा खोटा ठरल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं आव्हानही सुरेश धस यांनी दिलं.

ज्या खंडणीच्या आरोपात ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्याच दोन कोटी खंडणीची डील मंत्री धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. यानंतर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाच्या वादाचं लोण महायुतीत अजित पवार गट विरूद्ध भाजप असं होतंय का याची चर्चा रंगतेय. 2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? झाल्याचा खळबळजनक आरोप सुरेश धसांनी केला आहे. इतकंच नाहीतर दावा खोटा ठरल्यास राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं आव्हानही सुरेश धस यांनी दिलं. वाल्मिक कराडने जितकी माया जमवली त्यानुसार या प्रकरणाची ईडीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी सुरेश धसांनी केली आहे. ज्या गाडीतून वाल्मिक कराड सरेंडर झाला त्या गाडीच्या मालकाने आपली सीआयडी कार्यालय जवळ भेट झाली. त्यावेळी वाल्मिक कराडने सीआयडी ऑफिसपर्यंत लिफ्ट मागितली. त्यामुळे त्यांना गाडीतून सोडल्याचा दावा केला. त्यानंतर बजरंग सोनावणे यांनी सुद्धा यावर सडकून टीका केली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 06, 2025 08:53 AM