गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे, रक्षा खडसेंचा खोचक टोला

| Updated on: Jun 25, 2021 | 8:18 AM

यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. (BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil)

जळगाव : केळी पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यावरून केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी यांच्यात श्रेय घेण्यावरुन वाद सुरु झाला आहे. याच वादातून राज्याचे पाणी पुरवठा योजना मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळाला.

केळी पीक योजनेच्या नुकसान भरपाईचे निकष बदल करण्याचे श्रेय मी घेत नाही. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे मला वडिलांसारखे आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्यांनी माझ्यावर टीका न करता मुलीने चांगले काम केले म्हणून प्रोत्साहन द्यायला हवे,  असा खोचक टोला भाजप खासदार रक्षा खडसे यांना लगावला. (BJP MP Raksha Khadse criticizes Water Supply Minister gulabrao patil)