'मी राजकारणात उगीच आलो', सुजय विखे पाटील असं का म्हणाले? बघा व्हिडीओ

‘मी राजकारणात उगीच आलो’, सुजय विखे पाटील असं का म्हणाले? बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 26, 2023 | 9:28 PM

VIDEO | भाजप खासदार सुजय विखे पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका, काय म्हणाले बघा व्हिडीओ

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचा वेग पाहता त्यांच्यावर कोणतेही कारण मिळत नसल्याने महापुरुषांचे नाव घेऊन मीडियात राहण्याचा अनेकांचा प्रयत्न असल्याचे म्हणत भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा असा प्रयत्न असतो की एखादं वादग्रस्त वक्तव्य केले की माध्यम त्यांच्याकडे वळतील, मात्र मला विश्वास आहे की, येणाऱ्या लोकसभेत त्यांचा हा भ्रम जनता उतरविल्या शिवाय राहणार नाही. यावेळी ते असेही म्हणाले की, मी राजकारणात उगीच आलो, मला माहित असतं इतके मानसिक रोगी राज्यात आणि देशात आहे तर मी माझा डॉक्टर म्हणून व्यवसाय केला असता, अशी टीकाही विरोधकांवर सुजित विखे पाटील यांनी केली.

Published on: Feb 26, 2023 09:28 PM