'मग मराठा समाजाला न्याय का नाही?', उदयनराजे भोसले यांचा सरकारला काय थेट सवाल

‘मग मराठा समाजाला न्याय का नाही?’, उदयनराजे भोसले यांचा सरकारला काय थेट सवाल

| Updated on: Sep 02, 2023 | 5:49 PM

VIDEO | 'येत्या दोन दिवसांत बैठका घेण्याचे आश्वासन देत मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, तुम्ही चर्चेला तयार राहा. मी गुन्हे मागे घ्यायला लावतो', उदयनराजे भोसले यांनी काय दिला मोठा इशारा

जालना, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याचा प्रकार घडला. यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. उदयनराजे यांनी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. पण चर्चेशिवाय गोष्टी सुटणार नाहीत, असे म्हटले. तुम्ही चर्चेला तयार राहा. मी गुन्हे मागे घ्यायला लावतो, असं उदयनराजे जरांगे पाटील यांना म्हणाले. येत्या दोन दिवसांत बैठका घेतो असं उदयनराजे यावेळी म्हणाले. माझी सर्वांना विनंती आहे की, आपल्या शांततेत आंदोलन करायचं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची काल माझी भेट झाली. या दोन-तीन दिवसातच चर्चा करुन लवकरात लवकर आंदोलकांची भेट घालून देऊ. एक-दोन नाही तर 57 महामार्चा झाले पण कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पण त्याचा असा अर्थ नाही की मराठा समाज सहन करतो म्हणून प्रतिक्षा करावी. इतर समाजाला न्याय, मग मराठा समाजाला न्याय का नाही? असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला विचारला.

Published on: Sep 02, 2023 05:49 PM