नांदायचं असेल तर… उदय सामंत यांच्या ‘त्या’ दाव्यावर नारायण राणे यांनी फटकारलं
आम्ही ओरिजनल आहोत आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या या दाव्यावर नारायण राणे यांनी पलटवार केलाय. नारायण राणे म्हणाले, उदय सामंत बोलतील तसंच होईल असे सांगता येत नाही. आम्ही ओरिजनल आहोत.
रत्नागिरी, ३ जानेवारी २०२४ : 48 मतदार संघात कोणालाही कुठे दावा करायचा अधिकार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा माझा मतदारसंघ आहे. जवळजवळ सव्वा लाखाचं मताधिक्य मतदार संघातून होतं म्हणूनच आम्ही हा दावा केलाय, असे म्हणत आम्ही ओरिजनल आहोत आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर आमचा दावा आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. उदय सामंत यांच्या या दाव्यावर नारायण राणे यांनी पलटवार केलाय. नारायण राणे म्हणाले, उदय सामंत बोलतील तसंच होईल असे सांगता येत नाही. आम्ही ओरिजनल आहोत. कुठून ही आलो असलो तरी भाजपमध्ये आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी मतदार संघावर आमचा दावा सुरूच आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी भाष्य करू नये. कोण उमेदवार आहे हे आमचा पक्ष ठरवेल. नांदायचं असेल आणि मंगळसूत्र घातलं तर त्याचं (युतीचं) पावित्र्य राखलं पाहिजे.
Published on: Jan 03, 2024 04:41 PM
Latest Videos