महाविकास आघाडीत फूट अटळ, भाजपच्या ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा काय ?
महाविकास आघाडीची आज अंतिम टप्प्यातील बैठक पार पडत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांना सवाल केला असता त्यांनी खळबळजनक दावा केलाय
मुंबई, २५ जानेवारी २०२४ : महाविकास आघाडीची आज अंतिम टप्प्यातील बैठक पार पडत आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याचा निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यासंदर्भात भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांना सवाल केला असता त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या विविध पक्षांकडून वाटाघाटी करणारे जे नेते आहेत त्यापैकी किमान दोन नेते यांची भाजप सोबत बोलणी झाली आहे आणि ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. इंडिया आघाडीतून ममता बॅनर्जी असतील किंवा आप हा पक्ष वेगळा झाला आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातही फूट नक्कीच दिसणार आहे, असा खळबळजनक दावाही भाजप नेते डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे. तर महाविकास आघाडीतील मोठे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बघायला मिळतील, असा दावाही डॅा. आशिष देशमुख यांनी केला आहे.