उद्धव ठाकरे यांना 440 वॉल्टचा करंट द्या अन् कोळसा करा, कुणी उधळली मुक्ताफळे?

उद्धव ठाकरे यांना 440 वॉल्टचा करंट द्या अन् कोळसा करा, कुणी उधळली मुक्ताफळे?

| Updated on: Oct 29, 2023 | 9:39 AM

VIDEO | भाजपा विरोधात 28 पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना, यामध्ये तामिळनाडूतील मंत्री उदयसिंह देखील आहे. या मंत्र्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केली. अशा हिंदूधर्म संपवणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांबरोबर युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना युती तोडावीच लागेल

ठाणे, २९ ऑक्टोबर २०२३ | भाजपा विरोधात 28 पक्ष एकत्र येत इंडियाची स्थापना केली आहे. यात तामिळनाडूतील एक मंत्री उदयसिंह देखील आहे या मंत्र्यांनी सनातन हिंदू धर्म संपवण्याची घोषणा केली असून अशा हिंदूधर्म संपवणाऱ्यांची भाषा करणाऱ्यांबरोबर युती करणाऱ्या उद्धव ठाकरेंना ही युती तोडावीच लागेल जर त्यांनी युती तोडली नाही तर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या मशीनचे बटन दाबून उद्धव ठाकरे यांना 440 वर्ल्ड चा शॉक देऊन त्यांचा कोळसा करा, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याणमध्ये केले. मराठा समाजाच्या वतीने कल्याणात संपर्क ते समर्थन अभियानासाठी आलेल्या बावनकुळे यांना मराठा समाजाच्या कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले बावनकुळे विरोधात जोरदार घोषणेबाजी केली. यावेळी काळे झेंडे दाखवणारे उबाठा पदाधिकारी आहे मला माहित असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Published on: Oct 29, 2023 09:39 AM