नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता, व्यावसायिक कामानिमित्त गेल्या अन्...

नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता, व्यावसायिक कामानिमित्त गेल्या अन्…

| Updated on: Aug 08, 2023 | 10:59 AM

VIDEO | नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

नागपूर, ८ ऑगस्ट २०२३ | नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या आहेत. तर सना खान यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण गेल्या १ जुलैपासून सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूरमधून बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सना खान या मध्यप्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामासाठी गेल्या होत्या आणि १ जुलैनंतर त्या नागपुरात परतल्याच नसल्याची माहिती मिळत आहे.

Published on: Aug 08, 2023 10:59 AM