IAS अधिकारी रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स, काय आहे प्रकरण?
VIDEO | मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि IAS अधिकारी रमाकांत बिरादार यांच्या अडचणी वाढल्या? किशोरी पेडणेकर यांच्यासोबत रमाकांत बिरादार सह-आरोपी
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि IAS अधिकारी रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स बजावण्यात आले आहे. कथित कोव्हीड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आलं आहे. तर अधिकारी रमाकांत बिरादार यांची उद्या चौकशी देखील होणार आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि IAS अधिकारी रमाकांत बिरादार हे आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी आणि कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी किशोरी पेडणकर यांना न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. २९ ऑगस्टपर्यंत कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
Published on: Aug 25, 2023 12:10 AM
Latest Videos