सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका, कुणी दिली जीवे मारण्याची धमकी
VIDEO | भाईजान सलमान खान याला पुन्हा एकदा ई मेलद्वारे धमकी देण्यात आली, कुणी दिली धमकी?
मुंबई : बॉलिवूड विश्वातील अभिनेता भाईजान सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. ही धमकी सलमान खानला ई मेलद्वारे देण्यात आली असून यापूर्वीही सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणी सलमान खानच्या मॅनेजरकडून वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी सतर्कता दाखवत या धमकी प्रकरणी बिष्णोई गँगच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वांद्रे येथील बँड स्टँड या परिसरात जो सलमान खानचे वडील हे चालण्यासाठी गेले असताना त्यांच्या बाजूला कुणीतरी एक चिठ्ठी ठेवून ही धमकी दिली होती. मात्र आता सलमान खानला जो मेल आला आहे. त्या मेलमध्ये दिल्लीच्या तुरूंगात असलेल्या गुंड बिष्णोईच्या नावाचा उल्लेख आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याची एक मुलाखत दाखवण्यात आली होती. या मुलाखतीबाबत सांगत सलमानखानला धमकी देण्यात आली आहे.