तुमच्याकडे बुलेट आहे? बुलेट चालकांवर पोलिसांकडून का होतेय कारवाई?
VIDEO | बुलेट चालकांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, पोलिसांकडून बुलेट चालकांवर होतेय कारवाईची मोहीम
बुलढाणा : तुमच्याकडे बुलेट आहे का? तुम्ही बुलेटवरून प्रवास करता का? मग तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण सध्या बुलेट गाडीमध्ये अनेक बदल चालकांकडून केले जातात. तरूणाईमध्ये बुलेटची क्रेझ फार पूर्वीपासून बघायला मिळते. अनेक जण तर या बुलेटचे फॅनही असतात. बऱ्याचदा काहीजणांकडून बुलेटच्या सायलेन्सरमध्ये देखील बदल केला जातो. मात्र आता असा बदल करणं चांगलंच महागात पडणार आहे. अलीकडच्या काळात बुलेटचे सायलेन्सर बदलून फटाके फोडण्याची मोठी क्रेझ वाढली आहे, मात्र असा प्रकार केल्याने यातून निघणाऱ्या कर्नकर्कश आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. सामान्य नागरिकांचा त्रास लक्षात घेता बुलढाण्यातील खामगाव शहरातील वाढती बुलेटची संख्या पाहता शहर पोलिसांनी बुलेट मालकासह सायलेन्सरमध्ये छेडछाड करून देणाऱ्या गॅरेज चालकावर देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. बुलढाण्यातील खामगाव शहर पोलिसांनी आता अशा लोकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. इतकेच नाही तर मोटार वाहन कायद्यानुसारच वाहने चालवावीत अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील यावेळी पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.