निवडणूक निकालाधीच काळाचा घाला; उमेदवाराचा अपघातात मृत्यू

निवडणूक निकालाधीच काळाचा घाला; उमेदवाराचा अपघातात मृत्यू

| Updated on: Jan 15, 2022 | 10:39 PM

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधील ही घटना आहे. पंकज पवार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.

नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीचा (Nagar Panchayat Electionनिकाल लागण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. नाशिक ( nashik ) जिल्ह्यातील सुरगाणामधील (surgana) ही घटना आहे. पंकज पवार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पंकजसह आणखी एकाचा अपघाती मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव दुचाकी झाडाला आदळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये पंकज पवार यांच्यासह एक जणाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळतचा स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमीवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पंकज याने सुरगाणा नगरपंचायतची निवडणूक लढवली होती. मात्र निकाल येण्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.