कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्...

कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्…

| Updated on: Dec 08, 2023 | 2:09 PM

कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादकांसह कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, उमराणा येथे कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करून निषेध तर शेकडो शेतकऱ्यांनी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको

नाशिक, ८ डिसेंबर २०२३ : केंद्र सरकारच्या 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात सर्वत्र पडसाद उमटले आहेत. नोव्हेंबर महिन्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकटानंतर आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांदा उत्पादकांच्या विरोधात सुलतानी निर्णय घेतला आहे. कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादकांसह कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, उमराणा येथे कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद करून निषेध केला तर शेकडो शेतकऱ्यांनी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको केला तर नांदगावमध्येही संतप्त शेतकऱ्यांनी येवला रोडवर रस्त्यावर उतरत आंदोलन केले. मनमाड, मुंगसे येथे व्यापाऱ्यांना कांदा लिलाव बंद पडले. लासलगाव बाजार समितीने केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव पिंपळगाव, चांदवडसह नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलावही बंद पाडले आहेत.

Published on: Dec 08, 2023 02:09 PM