VIDEO : Sanjay Raut | केंद्र सरकारने देशाची माफी मागावी, संजय राऊत यांचा सल्ला
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे.
नोटाबंदीला पाच वर्षपूर्ण झाली आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. नोटाबंदीच्या घिसाडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही मागणी केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज पाच वर्षात काश्मीरमध्ये सर्वाधिक दहशतवाद वाढला आहे. याच पाच वर्षात देशात सर्वात जास्त काळापैसा वाढला आहे. त्यामुळे नोटाबंदी पूर्ण अपयशी ठरली आहे. नोटाबंदीचा निर्णय हा आर्थिक डिजास्टर होता. नोटाबंदी झाल्यावर शेकडो लोकांना नोकरी आणि प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्र सरकारने देशाची माफी मगाायला हवी, असं राऊत म्हणाले.