केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे सरकारला पत्र, कांदा निर्यात शुल्कावर केली ‘ही’ मागणी
VIDEO | कांदा निर्यात दर बाबत फेरविचार करण्याची मागणी करत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सरकारकडे पत्र देखील पाठवले. यानंतर केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार
नाशिक, २२ ऑगस्ट २०२३ | केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केली आहे. केंद्राच्या कांदा निर्यात शुल्कात ४० टक्के वाढ केल्याच्या या निर्णयामुळे राज्यभरातील कांदा व्यापारी आणि शेतकरी यांच्यात संताप झाल्याचे पाहायला मिळत आहे तर याविरोधात वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर देवेंद्र फडणवीस, पियुष गोयल आणि भारती पवार या मंत्र्यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला होता. दरम्यान, कांदा निर्यात दर बाबत फेरविचार करण्याची मागणी करत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सरकारकडे पत्र देखील पाठवले. यानंतर केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची माहिती भारती पवार यांनी दिली. तर 2410 रुपये दर देऊन कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कांदा निर्यात शुल्क लागण्याआधी जो कांदा निर्यात साठी नाशिक मधून गेला आहे त्यावर कर माफ करण्याची व्यापाऱ्यांची मागणी होती. यावर देखील विचार करत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचे भारती पवार यांनी म्हटले. या वर तोडगा निघेल तोपर्यंत कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव सुरू करावा, असे आवाहन भारती पवार यांनी केले आहे.