CBI ची मोठी कारवाई ! मुंबईतून कस्टमच्या 6 अधिकाऱ्यांना ठोकल्या बेड्या ; काय आहे प्रकरण?

CBI ची मोठी कारवाई ! मुंबईतून कस्टमच्या 6 अधिकाऱ्यांना ठोकल्या बेड्या ; काय आहे प्रकरण?

| Updated on: Mar 16, 2023 | 10:11 PM

VIDEO | सीबीआयकडून कस्टम विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर मुंबईत एकच खळबळ, का ठोकल्या CBI ने बेड्या?

मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने मुंबईत मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. सीबीआयने कस्टम विभागाच्या तब्बल 6 अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआयने कस्टम विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या गुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाच्या 6 अधिक्षकांऱ्यावर 6 वेगवेगळ्या प्रकरणात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय दोन खाजगी इसमांनाही सीबीआयने अटक केली आहे. तसेच या प्रकरणात सीबीआयने तब्बल 19 ठिकणी शोध मोहीम राबविली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या लोकांकडून 2 कोटी 38 लाख रुपये घेतल्याचं प्राथमिक तपासातून उघड झाले आहे.

Published on: Mar 16, 2023 10:11 PM