Special Report | ‘प्रहार’मधून गुरुवारी ठाकरेंवर राणेंचा ‘बाण’!
उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणेंनीही कंबर कसलीये. त्याची झलक राणेंनी त्यांचे मुखपत्र प्रहार या वृत्तपत्रात बातमी स्वरुपात पोस्ट करुन दाखवली. हिंमत असेल तर शिंगावर घ्या असं आव्हानच राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय.
मुंबई : सध्या सामाविरुद्ध तरुण भारत आणि सामना विरुद्ध प्रहार अशी तिहेरी लढत सुरु झाली आहे. राणे प्रहारमधून गुरुवारी कसा प्रहार करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दसरा मेळाव्यात पंतप्रधान मोदी आणि भाजपवर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आता राणे आक्रमक झालेत. उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी नारायण राणेंनीही कंबर कसलीये. त्याची झलक राणेंनी त्यांचे मुखपत्र प्रहार या वृत्तपत्रात बातमी स्वरुपात पोस्ट करुन दाखवली. हिंमत असेल तर शिंगावर घ्या असं आव्हानच राणेंनी उद्धव ठाकरेंना दिलंय. दुसरीकडे सामना विरुद्ध तरुण भारत अशी संपादकीय लढाई रंगली आहे. शरद पवारांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर काही जण गांजा मारुन बोलतात अशी टीका राऊतांनी केली होती. संपादकीयतून कमी प्रतीचा गांजा अशी टीका केली आहे. याच टीकेला भाजपची बाजू घेणाऱ्या तरुण भारतमधून प्रत्युत्तर देण्यात आलं.