Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला कॉन्ट्रॅक्टरचा समाचार

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला कॉन्ट्रॅक्टरचा समाचार

| Updated on: Jun 17, 2021 | 8:25 PM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आता वर्ध्यात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आलाय.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आता वर्ध्यात त्यांच्या याच स्वभावाचा प्रत्यय आलाय. रस्त्यांची कामं करणाऱ्या ठेकेदारांकडून वृक्षारोपण करण्यात होणारी कामचुकवेगिरीवर निशाणा साधत गडकरींना सार्वजनिकपणे या कॉन्ट्रॅक्टरचा समाचार घेतलाय. मी कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे घेत भ**गिरी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून झाडं मोजून लावून घ्या. ती झाडं लावली पाहिजे याची व्यवस्था करा, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सातवरील हिंगणघाट येथे नांदगाव चौरस्त्यावरील उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड परिसरातील कार्यक्रमात ते बोलत होते. (Central Minister Nitin Gadkari Slams road contractor publicly for not planting trees on highway in Wardha)