लाज वाटते, लोकलमधून जनावरांसारखा लोकांचा प्रवास; हायकोर्टानं रेल्वेचे काढले वाभाडे

लाज वाटते, लोकलमधून जनावरांसारखा लोकांचा प्रवास; हायकोर्टानं रेल्वेचे काढले वाभाडे

| Updated on: Sep 20, 2024 | 3:02 PM

लोकलमधून जनावरांप्रमाणे रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता, असं म्हणत हायकोर्टाकडून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे वाभाडे काढण्यात आले आहे. ज्या अवस्थेत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय ते पाहून लाज वाटते, प्रवाशांच्या समस्येवर हायकोर्टाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला चांगलंच सुनावलंय

मुंबईच्या विविध उपनगरांत राहणाऱ्या कोट्यवधी लोकांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल… मुंबईच्या लोकलने कोट्यवधी लोकं रोज प्रवास करतात. मात्र दिवसेंदिवस या लोकलमध्ये प्रवाशांची कच्चाकच गर्दी होताना दिसतेय. कितीतरी वेळा लोकलने प्रवास करणाऱ्यांचा लोकलच्या दारातून पडून मृत्यू झाल्याच्याही बातम्या कानावर येतात. याच लोकलमधून प्रवाशांना दाटीवाटीने कराव्या लागणाऱ्या प्रवसाबद्दल मुंबई हायकोर्टाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला चांगलंच फटकारलंय. लोकलमधून जनावरांप्रमाणे रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता, असं म्हणत हायकोर्टाकडून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेचे वाभाडे काढण्यात आले आहे. ज्या अवस्थेत प्रवाशांना प्रवास करावा लागतोय ते पाहून लाज वाटते, प्रवाशांच्या समस्येवर हायकोर्टाने मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला चांगलंच सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोणत्याही सबबी देऊ नका, तोडगा समोर ठेवा, असंही हायकोर्टानं म्हटलं आहे.

Published on: Jun 27, 2024 01:27 PM