कारशेडमधून निघालेली ट्रेन प्लाटफॉर्मवर अन् एकच गोंधळ उडाला, बदलापूर रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात कारशेडमधून आलेल्या ट्रेनचे दरवाजे आतून बंद असल्याने प्रवाशांचा स्थानकात एकच गोंधळ उडाला. बदलापूर स्थानकात काल सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी गर्दीच्या वेळेला लोकलचे दरवाजे आतून बंद केले होते.
ठाणे, १३ डिसेंबर २०२३ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वाटेला कधी कोणती समस्या पुढे येऊन ठेपेल याचा काही नेम नाही. अशीच एक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकात कारशेडमधून आलेल्या ट्रेनचे दरवाजे आतून बंद असल्याने प्रवाशांचा स्थानकात एकच गोंधळ उडाला. बदलापूर स्थानकात काल सकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी गर्दीच्या वेळेला लोकलचे दरवाजे आतून बंद केले होते. तर दरवाजा उघडण्याचे सांगूनही आतील लोकांनी ते उघडले नाही. त्यामुळे स्टेशनवर प्रवाशांनी मोठा गोंधळ घातला. या घटनेनंतर रेल्वे प्रशासने हस्तक्षेप करत हे दरवाजे उघडत हा वाद मिटवला. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणात रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तीन महिलांना चौकशी सुरू आहे.
याआधीही या ठिकाणी एका महिलेला डब्यातून मारहाण करून डब्याच्या बाहेर काढण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विशेषता बदलापूर वांगणी या परिसरामध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या ठिकाणी लोकल फेऱ्या कमी होत असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने असे प्रकार होताना पाहायला मिळत आहे. तर वांगणी परिसरातील काही महिला कार्डशेड मधूनच बसून प्रवास करतात व आपला ग्रुप बनवून स्टेशनवर चढणाऱ्या महिलांवरती आपली दबंगिरी करतात, रेल्वे संघटनेकडून या महिलांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होतेय.