Shivaji Maharaj Temple Video : महाराष्ट्रात शिवरायांचं एकमेव मंदिर, भिवंडीत 4 एकरवर उभारलं भव्य अन् डोळ्यात भरणारं देऊळ, नेमकं खास काय?
शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून भिवंडी वाडा रस्त्यावरील मराडे पाडा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर आज उभारण्यात आलं आहे. महाराजांचं भव्यदिव्य मंदिर पाहून अचंबित व्हाल
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. भिवंडीतील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी माजाराजांचे हे भव्य मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे महाराष्ट्रातील पहिलेच भव्य ठरले आहे. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिरांच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट इतके आहे. तर या भव्य मंदिराची तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे. हे भव्य दिव्य मंदिर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. दरम्यान, आज १७ मार्चला विविध मान्यवर, राजकीय नेते,मंत्री यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे. या मंदिरासाठी आजुबाजूचा परिसर, रस्ते आणि चांगल्या पद्धतीचे पर्यटन स्थळ व्हावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजप आमदार किसन कथोरे यांनी एक पत्र लिहिले असून यासंदर्भात ते मागणी करणार आहे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?

