हिंमत की किंमत होती है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले, बघा व्हिडीओ

हिंमत की किंमत होती है, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का म्हणाले, बघा व्हिडीओ

| Updated on: Feb 20, 2023 | 8:55 PM

VIDEO | पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला केलं आवाहन

पुणे : कसबा आणि पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप-शिवसेना युती असा हा सामना होतोय. या निवडणुकीत राज्यातील बडे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले असताना पुण्यात कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झाली आहे. यावेळी उपस्थित नागरिकांशी एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. ते म्हणले, कधी कधी धाडस करावं लागतं आणि तुम्हाला विश्वास आहे ना निर्णय घेणारा एकनाथ शिंदे आणि शिंदे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील पूर्ण करायचे निर्णय पूर्ण झाले नाही ते बंद पडले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर समाजातील प्रत्येक घटकासाठी हे सरकार निर्णय घेत आहे. जनतेसाठी जे आवश्यक आहे ते करावं लागतं आणि त्यासाठी हिंमत तर करावी लागते, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Published on: Feb 20, 2023 08:55 PM