मुख्यमंत्र्यांची पैठण सभा! तुफान गर्दी
याआधी सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळे आता पैसे देऊन सभेला बोलावले जात असल्याचा आरोप देखील केला जातोय.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची आज मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदार संघात जाहीर सभा होणार आहे. आतापर्यंतच्या अडीच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी (Rally) सभा घेतल्या अन् मैदानही गाजवले. पैठणच्या सभेची गोष्ट वेगळी आहे. यापूर्वी मंत्री झाल्यानंतर प्रथमच संदीपान भुमरे हे मतदार संघात दाखल झाले होते. याआधी सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो तुफान व्हायरल (Viral) झाले होते. त्यामुळे आता पैसे देऊन सभेला बोलावले जात असल्याचा आरोप देखील केला जातोय. आता मात्र पैठणच्या या सभेला तुफान गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय.
Latest Videos
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट

