कलावती बांदूरकर यांनीच मंत्री अमित शाह यांचा ‘तो’ दावा खोडला, बघा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा कलावती बांदूरकर यांनी खोडला, काय होता तो दावा... बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, १० ऑगस्ट २०२३ | काल लोकसभेत मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील कलावती बांदूरकर यांचा उल्लेख केला. कलावती बांदूरकर यांना राहुल गांधी यांनी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यांनी मदत केली, असा दावा केला. कोण आहेत कलावती बांदूरकर..आणि अमित शाह यांनी केलेल्या दाव्यात किती तथ्य आहे…जाणून घ्या… २००८ मध्ये राहुल गांधी हे यवतमाळच्या कलावती बांदूरकर यांना भेटले होते. त्यावेळी संसंदेत भाषण करताना राहुल गांधी यांनी कलावती बांदूरकर यांच्या व्यथा मांडल्या होत्या. पण अमित शाह यांनी कलावती बांदूरकर यांना राहुल गांधी यांनी नाही तर मोदी सरकारने मदत केल्याचा दावा केलाय. बुधवारी संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी यवतमाळच्या कलावती बांदूरकर या शेतकरी विधवा महिलेला काँग्रेसने केलेल्या मदतीच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं, त्यावरून कलावती बांदूरकर या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बघा याबाबतचा स्पेशल रिपोर्ट
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

