एक फुल अन् एक हाफनं शिकवू नये, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
VIDEO | नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथील रूग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले. या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर घरात बसून नोटा मोजण्याचं काम उद्धव ठाकरे करत होते, शिंदे यांनी काय केली सडकून टीका?
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ | नांदेड, नागपूर, संभाजीनगर येथील रूग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. यावर एकनाथ शिंदे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनातील मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, मृतांची बॉडीबॅग, खिचडीमध्ये पैसे खाल्लेल्यांनी बोलू नये, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तर कोरोनाकाळात तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते. घरात बसून नोटा मोजण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर एक फुल आणि एक हाफनं आम्हाला शिकवण्याची गरज नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी खोचक टोलाही लगावला. ‘मी जेव्हा पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये मदत करत होतो, तेव्हा हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांचीही अँटिजेन टेस्ट करून दोन दोन तास बसवून नंतर भेटत होते. असे मुख्यमंत्री जगाने पाहिले नसतील. त्यांचा खरा चेहरा लोकांनी कोरोनामध्ये पाहिलाय’, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.