यंदा कुणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार अन् कुणाचा आवाज घुमणार? शिंदे की ठाकरे?

यंदा कुणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार अन् कुणाचा आवाज घुमणार? शिंदे की ठाकरे?

| Updated on: Sep 30, 2023 | 11:18 AM

tv9 Special Report | एकनाथ शिंदे यांची शिवसेना की उद्धव ठाकरे यांची शिवसेना... कोणाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिंदे गट आणि ठाकरे गट या दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरापूर्वीच ठाकरे आणि शिंदे गटाकडून महापालिकेला अर्ज दाखल

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ | येत्या २४ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही शिंदे गट आणि ठाकरे गट या दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आलेत. कारण दोन्ही गटाकडून मुंबई महापालिकेकडून दसरा मेळाव्याकरता शिवाजीपार्क मिळावं याकरता अर्ज करण्यात आलाय. दरम्यान, यंदा दादर येथील शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. शिवसेना आणि शिवाजी पार्कावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याला शिवतीर्थ आपल्यालाच मिळावं यासाठी प्रयत्न सुरूये. दादरच्या शिवाजी पार्क मैदानासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनीही मुंबई महापालिकेकडे महिनाभरआधीच अर्ज दिलाय. त्यामुळे शिवाजी पार्कावर कोणाचा आवाज घुमणार? आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Sep 30, 2023 11:18 AM