Ladki Bahin Yojana : महिलांनो… आता ‘या’ ॲपवरून घरबसल्या करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेचा अर्ज
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. नक्की हे ऍप कसे वापरायचे याचं प्रत्यक्षिक आपण पाहुयात...
नुकतीच सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रूपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लभ मिळावा यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आता डिजिटल पद्धतीने भरता येणार आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर काही तांत्रिक कारणामुळे बंद असलेले लाडली बहीण योजनेचे ऍप सुरू झाले आहे. नारीशक्ती दूत असे या ऍपचे नाव असून ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. लाडली बहीण योजनेच्या ऍप मध्ये अद्यापही उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम सुरू आहे. मात्र येत्या दोन दिवसात ते अपडेट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरबसल्या या योजनेसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. त्याशिवाय तहसील कार्यालय, अंगणवाडी सेविका, सेतू कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने देखील हा अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी आता उत्पन्न दाखल्याऐवजी रेशन कार्ड आणि रहिवासी दाखल्याऐवजी आधारकार्डचा वापर करता येणार आहे. नक्की हे ऍप कसे वापरायचे याचं प्रत्यक्षिक आपण पाहुयात…

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
