गृहिणींनो... दिवाळीच्या तोंडावर गणित बिघडणार, गॅस सिलिंडर महागला; 'इतक्या' रुपयांनी वाढ

गृहिणींनो… दिवाळीच्या तोंडावर गणित बिघडणार, गॅस सिलिंडर महागला; ‘इतक्या’ रुपयांनी वाढ

| Updated on: Oct 01, 2023 | 11:42 AM

VIDEO | 1 ऑक्टोबरपासून अनेक गोष्टीत बदल झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये गॅस सिलिंडरचे दर देखील आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 209 रुपयांची वाढ झाल्याने हॉटेलिंगसह सर्व गोष्टी महागणार तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत किती झाला बदल?

नवी दिल्ली, १ ऑक्टोबर २०२३ |ऑक्टोबरपासून अनेक गोष्टीत बदल झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये गॅस सिलिंडरचे दर हा मुद्दा देखील आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सामान्य गृहिणींचं गणित बिघडणार असल्याची चर्चा होतेय. ३० ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय घेतला होता. त्यावेळी गॅसच्या दरात २०० रुपयाने दिलासा दिला होता. त्यामुळे पुढे गॅसचे दर कमी होतील अशी आशा सामान्य नागरिकांना असताना पुन्हा सिलिंडरचे दर वाढल्याचे समोर आले आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत दोनशेहून अधिक रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे मुंबईत १९ किलो व्यावसायिक सिलिंडरचा दर हा १ हजार ६८४ रूपयांवर गेला आहे. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत अद्याप कोणातीही वाढ करण्यात आली नसल्याने त्याचे दर स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. नव्या दरवाढीनुसार नवी दिल्लीत 19 किलो ग्रॅम सॅस सिलिंडरचे दर १७३१.५०, कोलकाता १८३९.५० रुपये तर मुंबईत १६८४ रुपये झाले आहेत.

Published on: Oct 01, 2023 11:25 AM